घरनवरात्रौत्सव 2022'एसआरएस'च्या दांडीया, गरबा उत्सवाची आज धूम

‘एसआरएस’च्या दांडीया, गरबा उत्सवाची आज धूम

Subscribe

नाशिक : शहरातील एसआरएस गुु्रपच्या वतीने नक्षत्र लॉन्स येथे गरबा डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला तरूण, तरूणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, यानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. दैनिक आपलं महानगर, माय महानगर लाइव्ह, माय महानगर मानिनी माध्यम प्रायोजक असलेल्या या स्पर्धेत कलाकारांना भेटण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

एसआरएस महिला ग्रुपच्या वतीनेही ३० सप्टेंबर रोजी गंगापूररोडवरील नक्षत्र लॉन्स येथे सायंकाळी ६ वाजता गरबा रास दांडीयाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध गटांत ही स्पर्धा होेणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना ११ हजार रूपयांची पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विविध आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहेत. नाशिककरांनी या दांडीया गरबा रास कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन एसआरएस गु्रुपच्या संयोजिका रोशनी राठी, सई संघई, साधना गिलालकर यांनी केले आहे.

- Advertisement -
पैठणीचे विशेष आकर्षण 

स्पर्धेतील विजेत्यांना ११ हजार रूपयांची पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विविध आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहे. या महोत्सवाला तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं फेम पूनम देशमुख, ग्लोबल युनिर्व्हसल क्वीन पूनम बिरारी, उधाण गुु्रपचे अध्यक्ष जगदीश बोडके, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोडक आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौघुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -