Saturday, April 20, 2024
घरमानिनीReligiousNavratri 2023 : धनवान होण्यासाठी नवरात्रीमध्ये करा 'हे' चमत्कारी उपाय

Navratri 2023 : धनवान होण्यासाठी नवरात्रीमध्ये करा ‘हे’ चमत्कारी उपाय

Subscribe

आज शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. शारदीय नवरात्र संपायला अजून पाच दिवस बाकी आहेत. अपार धन-संपत्ती मिळवायची असेल तर तुम्ही नवरात्रीच्या उरलेल्या पाच दिवसांत काही उपाय करू शकता.

नवरात्रीत करा ‘हे’ चमत्कारी उपाय

- Advertisement -
  • लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भारतीय आहारात लवंग मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हिंदू धर्मात देवतांच्या पूजेमध्ये, तंत्र-मंत्रापासून ज्योतिष शास्त्रामध्ये देखील लवंग खूप महत्वपूर्ण आहे. लवंगच्या उपायांनी राहू-केतूचा वाईट प्रभाव देखील कमी होतो.
  • ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू-केतू संबंधित दोष आहेत. त्यांनी सतत लवंग दान करावी. शक्य नसल्याच शिवपिंडीवर दररोज 11 लवंग अर्पण करा. यामुळे सर्व संकटं दूर होतात.
  • कामात सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या दिवशी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंगा टाका. त्यानंतर तिथे बसून हनुमान चालीसा आणि दुर्गा चालीसेचा पाठ करा.
  • घरामध्ये आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीची पूजा करा आणि यामध्ये देवीला 2 लवंग सुद्धा अर्पण करा.
  • धनवान होण्यासाठी नवरात्रीदरम्यान, दुर्गा देवीसोबतच देवी लक्ष्मीची देखील पूजा करा. पूजेमध्ये 5 लवंग आणि 5 कवड्या सुद्धा ठेवा. पूजेनंतर यांना लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवून द्या.
  • घरातील कलह दूर करण्यासाठी 2 लवंगा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून घराच्या एका कोपऱ्यात ठेऊन द्या.

हेही वाचा  :

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करा देवी कुष्मांडाची आराधना

- Advertisment -

Manini