विजया दशमीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

नवरात्र संपताच 5 ऑक्टोबर रोजी दसरा देखील साजरा करण्यात येईल. यंदा दसऱ्याच्या दिवशी काही खास उपाय केल्यास नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस संपले की 10 व्या दिवशी विजया दशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, विजया दशमीच्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. तसेच घरातील हत्यारांचे पूजन केले जाते. दरम्यान, आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे. नवरात्र संपताच 5 ऑक्टोबर रोजी दसरा देखील साजरा करण्यात येईल. यंदा दसऱ्याच्या दिवशी काही खास उपाय केल्यास नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

विजया दशमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

  • चंद्राला सांगा आपल्या मनातली गोष्ट

तुम्हाला सतत मानसिक तणाल जाणवत असेल. मनात अज्ञात भीती वाटत असेल. तर दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत रोज रात्री चंद्र दर्शन करा. चंद्राच्या प्रकाशात 5 ते 10 मिनिट बसा आणि मनातल्या मनात आपल्या मनातली गोष्ट बोला.

हनुमान मंदिरात करा हे काम

दसऱ्याच्या दिवशी हनुमान मंदिरात गूळ आणि चन्याचा नैवेद्य दाखवा. तसेच त्यांच्याकडे विजयाची कामना करा.

शमीच्या झाडाखाली लावा दीवा


दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दीवा लावल्यास सदैव विजय प्राप्ती होती आणि कधीही पराजय होत नाही.

गरजू व्यक्तिला करा दान


दसऱ्याच्या दिवशी गरजू व्यक्तिला अन्नदान, वस्त्रदान असे कोणतेही एक दान करा.


हेही वाचा  :

नवरात्रीच्या काळात चुकूनही करू नका ‘या’ चार गोष्टी