घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाला खूश करण्यासाठी करा 'हे' उपाय

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाला खूश करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Subscribe

देवी कुष्मांडाचा महिमा अद्वितीय आहे. असं म्हणतात की, जेव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये अंधकार पसरला होता. त्यावेळी देवी कुष्मांडामे आपल्या मधुर हास्याने ब्रह्मांडाची रचना केली.

आज शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा-आराधना केली जाते. देवी कुष्मांडाचा महिमा अद्वितीय आहे. असं म्हणतात की, जेव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये अंधकार पसरला होता. त्यावेळी देवी कुष्मांडामे आपल्या मधुर हास्याने ब्रह्मांडाची रचना केली. त्यामुळेच कुष्मांडाला आदि स्वरूपा आणि आदिशक्ति देखील म्हटलं जात.

कोण आहे देवी कुष्मांडा
कुष्मांडा नवदुर्गेतील चौथं स्वरूप आहे. देवी कुष्मांडाचे आठ हस्त आहेत. तसेच तिच्या सात हातांमध्ये धनुष्य, बाण, कमळ, कलश, चक्र, गदा, कमंडलू आहे तर आठव्या हातामध्ये सर्व सिद्धी आणि निधी आहेत. तिच्या हातामध्ये जो अमृत कलश आहे, तो तिच्या भक्तांया दुर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आहे. देवी कुष्मांडा सिंहावर स्वार असते.

- Advertisement -

देवी कुष्मांडाची पूजा कशी करावी?
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सकाळी लवकर उठून हिरव्या किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करा. देवीच्या पू़्जेदरम्यान, देवीला हिरवी वेलची, बडीशेप अर्पण करा. सोबतच “ॐ बुं बुधाय नमः” या मंत्राचा जप देखील करा. देवी कुष्मांडाच्या उपासनेने बुध ग्रह मजबूत होतो.

या उपायाने देखील खूश होणार देवी कुष्मांडा
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा करा. सोबतच तिला दही आणि हलव्याचा नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर फळं, सूखा मेवा आणि सौभाग्य अलंकार अर्पण करा. यामुळे देवी कुष्मांडा तुमच्यावर प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते.

- Advertisement -

 


हेही वाचा :

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करा देवी चंद्रघंटाची पूजा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -