बॉलीवूडचा सुपरस्टार कृष्णकुंजवर धाव घेतो ही फक्त राज ठाकरेंचीच ताकद

देशातील सर्वात मोठ्या चित्रपट क्षेत्रात बॉलीवूडमध्ये अनेक समस्या आहेत. राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली त्या सोडवणाऱ्या चित्रपट सेनेचं बॉलीवूडवर नीट लक्ष असतं. आणि मनसे कडून कलाकारांना त्रास होऊ नये याकडे राज ठाकरेंचं लक्ष असतं. राज ठाकरेंनी एखादा निर्णय घेतला की त्या क्षणाला तो आपल्याला झटकन कळत नाही. पण थोड्याच कालावधीत आपल्याला राज ठाकरे किती व्यापक बघतात हे कळून येते.आणि मग वाटतं आपण योग्य नेतृत्वाखाली काम करतोय. असं मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.