घरनवरात्रौत्सव 2022राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातून संचलन, शिस्तीचे दर्शन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातून संचलन, शिस्तीचे दर्शन

Subscribe

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वतीने दसर्‍यानिमित्त शहरातील विविध २१ ठिकाणी संचलन करण्यात आले. ‘भारत माता की जय’, ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘सनातन धर्म की जय’ अशा वेगवेगळ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन म्हणून विजयादशमी (दसरा)च्या दिवशी बुधवारी (दि.5) शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी सघोष संचालन करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी चौकांमध्ये रहिवाशांनी संचलनात सहभागी स्वयंसेवकांचे पुष्पवृष्टी करत स्वागत केले. खाकी रंगाची पॅण्ट आणि पांढरा शर्ट असा गणवेश परिधान करून स्वयंसेवक सहभागी झाले होते. संचलनाच्या अग्रस्थानी भारतमातेची प्रतिमा, दंडधारी स्वयंसेवक, भगवा ध्वज हाती घेतलेले अश्वारूढ स्वयंसेवक, घोषपथक होते. यंदा स्वयंसेवकांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसून आली. सुमारे ५ हजार स्वयंसेवक या संचलनात सहभागी झाले होते.

पाथर्डी फाटा भागातील गुरुगोविंदसिंग नगर येथून सकाळी 7 वाजता गामणे मळा मैदान, वासन टोयोटो शोरूममागे, पोलीस कॉलनीजवळ येथून संचलनास सुरूवात झाली. अंबड लिंकरोडवरील खुटवडनगर या भागात सकाळी पाऊणे नऊ वाजता वरदविनायक मंदिराजवळून संचलनाला सुरुवात झाली. त्यात दीडशेहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. संचलनाचा समारोप माऊली लॉन्स येथे झाला.

- Advertisement -

रविवार कारंजा नगर संचलन सकाळी 7 वाजता बी. डी. भालेकर हायस्कूल येऊन सुरू झाले व याच ठिकाणी समारोप झाला. पंचवटी विभागात सकाळी 7 वाजता साई मंदिर-मधुबन कॉलनी- मालेगाव स्टॅण्ड, हनुमानवाडी राजपाल कॉलनी येथून साई मंदिर भागात समारोप झाला. जुने नाशिक भागातील संचलनाला शिवाजी महाराज चौक (कथडा) येथून सकाळी 8 वाजता तर द्वारका भागातील माणेकशा नगर येथून सुरुवात झाली. सातपूर भागातील संचलन सकाळी आठ वाजता जाणता राजा मैदान, अशोक नगर येथून दुर्गा माता मंदिर, श्रमिक नगर येथे समारोप झाला. नाशिकरोड भागातील संचलन मुक्तिधाम नगर येथून सकाळी साडेसात वाजता झाल्याची माहिती सहकार्यवाह मंगेश खाडीलकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -