Saturday, April 20, 2024
घरमानिनीKitchenNavratri 2023 : उपवास स्पेशल भगरीचा शिरा

Navratri 2023 : उपवास स्पेशल भगरीचा शिरा

Subscribe

नवरात्रीच्या उपवासामधे काही लोकांना शिरा चालतो आणि काही नाही. त्यामुळे आज आपण उपवासाला चालणार भगरीचा शिरा कसा तयार करतात हे पाहणार आहोत.

साहित्य : 

  • 1 वाटी भगरीच पीठ
  • 1 वाटी पिठी साखर
  • वेलची पुट
  • 1/2 वाटी खोबऱ्याचा किस
  • ड्रायफ्रूट्स
  • 1 वाटी दूध
  • साजूक तूप

कृती : 

भगरीचा शिरा | Bhagar Shira | Varai Sheera | Sama Chawal Shira | Fast Recipe | Navratri Fharal Recipe - YouTube

  • एका कढईत 2 ते 3 चमचे साजूक तूप घाला. त्यानंतर तूप वितळल्यानंतर त्यामध्ये भगरीचे पीठ घालायचं.
  • गॅस मध्यम आचेवर ठेवून लालसर होईपर्यंत भगर तूपामध्ये भाजा. भगरीचं पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर भगर तूप सोडू लागतं आणि पीठाला जाळी येते.
  • त्यामुळे यानंतर या मिश्रणात 1 वाटी दूध घालून मिश्रण एकजीव करा.
  • त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर आणि दीड चमचा वेलची पावडर घाला.
  • पुन्हा हे मिश्रण एकजीव करुन घ्या. एकजीव झाल्यानंतर 1 ते 2 वेळा झाकण ठेवून वाफवा.
  • त्यानंतर ड्रायफ्रूड मिश्रणावर टाकून भगरीचा शिरा सर्व्ह करा.

हेही वाचा : Navratri 2023 : उपवासात बनवा फराळी पॅटिस

- Advertisment -

Manini