Navratri 2021 Kanya pujan: अष्टमीच्या दिवशी का केले जाते कन्यापूजन? जाणून घ्या महत्त्व, विधी आणि मुहूर्त

कन्या पूजन करण्यासाठी वयवर्ष २ ते १० पर्यंतच्या लहान मुलींना पूजेसाठी आमंत्रित केले जाते

Navratri 2021 Kanya Pujan Ashtami importance, rituals and moments
Navratri 2021 Kanya pujan: अष्टमीच्या दिवशी का केले जाते कन्यापूजन? जाणून घ्या महत्त्व, विधी आणि मुहूर्त

शारदीय नवरात्र उत्सवाची आजची आठवी माळ आहे. आजच्या दिवसाला अष्टमी असे म्हणतात. या दिवसी कन्या पूजन करणे शुभ मानले जाते. अष्टमीच्या दिवशी अनेक ठिकाणी देवीचे होम केले जातात. आजच्या दिवशी गौरीमातेचे पूजन केले जाते. नवरात्रात पहिल्या दिवसापासून ते अष्टमीपर्यंत कन्या पूजन केले जाते. कन्या पूजनाला नवरात्रात विशेष महत्त्व आहे. जाणून घ्या कन्यापूजनाचे महत्त्व, कन्यापूजनाचा आजचा मुहूर्त आणि संपूर्ण विधी.

दुर्गा अष्टमी आज रात्री ८:०७ मिनिटांपर्यंत आहे. आज देवीची आठवी माळ चढवून गौरीमातेचे पूजन करुन कन्यापूजन करू शकता. आजचा दिवस सुकर्मा दिवस असल्याचे मानले जाते. सर्व महत्त्वाच्या कार्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आज दुपारी १२:०७ वाजल्यापासून दुपारी १:३४ वाजेपर्यंत राहु काळ असेल.

कन्या पूजनाचे नियम

कन्या पूजन करण्यासाठी वयवर्ष २ ते १० पर्यंतच्या लहान मुलींना पूजेसाठी आमंत्रित केले जाते. या दिवशी एकूण ९ मुलींना बोलवून त्यांची पूजा करुन त्यांना गोडाचे जेवण आणि दक्षिणा दिली जाते. ९ मुलींसोबत एक मुलगा देखील बसवा. त्याला कान्हा किंवा बटुक भैरव असे म्हटले जाते.

कन्या पूजन विधी

दुर्गा अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी देवीची पूजा करुन २ ते १० वर्षांच्या मुलींची पूजा केली जाते. कुमारी मुली या देवीच्या रुपात येतात असे मानले जाते. त्या येताच शंख नाद किंवा घंटनाद केला जातो. त्यानंतर त्यांना बसण्यासाठी सुंदर आसन तयार करावे. त्यानंतर आधी त्यांचे पाय धुवावे. पाय पुसून त्यावर फुले, अक्षता वाहाव्यात आणि नंतर त्याची पूजा करुन आरती करावी.

दुर्गा अष्टमीच्या दिवशी घरी आलेल्या ९ दुर्गांना गोडाचे जेवण किंवा पंचपक्वान करावे.दुर्गा अष्टमीच्या दिवशी पूरी,चणे किंवा शिरा हे पदार्थ मुलींना खाऊ घातले जातात. जेवण झाल्यानंतर मुलींना दक्षिणा म्हणून एखादी वस्तू किंवा पैसा देऊन त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडून यावे.


हेही वाचा – काल आणि उद्याच्या चिंतेपेक्षा आज मनसोक्त जगावं मनिषा म्हैसकर