घरनवरात्रौत्सव 2022तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस आजपासून सुरुवात

तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस आजपासून सुरुवात

Subscribe

यावर्षी 26 सप्टेंबर 2022 पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. 26 सप्टेंबर रोजी पहाटे तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना होऊन दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येईल.

तुळजापूरची तुळजा भवानी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत. शारदीय नवरात्रोत्सव सुरु होण्यापूर्वी तुळजाभवानी देवीच्या नऊ दिवसीय मंचकी निद्रेला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी सुहासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून आणि तुळजाभवानी देवीचे शेजघर तयार करण्यास सुरी सुरुवात केली. देवीच्या पलंगावर तीन गाद्या तीन लोड ठेवण्यात आले आणि त्यानंतर पलंगपोस टाकुन बाजुला मखमली पडदे लावण्यात आले. देवीचे शेजघर पलंगे कुंटुंबियांनी पहाटे पाच वाजता तयार केले.

हे ही वाचा – Dussehra 2021: दसऱ्याचे महत्त्व काय? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी

- Advertisement -

सकाळी साडेसहा नंतर तुळजाभवानी देवीच्या मूर्तीला भाविकांकडून दही,दुध आणि पंचामृताने अभिषेक करण्यात आल्यानंतर देवीची मूळमुर्ती स्वछ करण्यात आल्यानंतर वाघे कुंटुंबियांकडून देण्यात आलेली हळद (भंडारा) देवीला लावण्यात आली त्यानंतर देवीची मूळमुर्ती भोपे पुजारींनी अलगद उचलून ती शेजघरात आणून चांदीचा पलंगावर निद्रिस्त करण्यात आली. मूर्ती निद्रिस्त आल्यानंतर धुपारती सुद्धा करण्यात आली. त्यानंतर देवीची प्रक्षाळपूजा पार पडली आणि तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधीच्या नऊ दिवसीय मंचकी निद्रेस प्रारंभ झाला. यावेळी तुळजाभवानी देवीचे मंहत भोपे पुजारी सेवेकरी मंदीर विश्वस्त प्रशासकीय अधिकारी कर्मचारी ही सर्व मंडळी उपस्थितीत होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रा कालावधीत देवीला सकाळी आणि संध्याकाळी सुगंधी तेलाचा अभिषेक केला जाणार आहे. तुळजाभवानी मातेची मंचकीनिद्रा सुरु असताना पुजारीवृंद विश्रांतीसाठी गादी उशी पलंग याचा वापर करत नाहीत. कारण यावेळी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरु असते.

तुळजाभवानी मंदिर

हे ही वाचा – नवरात्रीमध्ये अखंड दिवा का लावला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि नियम

- Advertisement -

देवीची मंचकी निद्रा म्हणजे नेमकं काय?

मंचकी म्हणजे पलंग. याचे संदर्भ पौराणिक कथांमध्ये सापडतात. पौराणिक कथेनुसार, नवरात्रोत्सव सुरु होण्या आधी देवी योग निद्रेत होती. यावेळी देवतांचं महिषासूर राक्षसासोबत युद्ध सुरु होतं. महिषासुराचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म, विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसांनंतर निद्रेतून उठवतात आणि देवलोकांचं रक्षण करण्याची विनवणी करतात. यावेळी देवी निद्रेतून जागी होऊन विक्राळ रुप धारण करते आणि महिषासूराचा वध करते. त्यामुळे दरवर्षी नवरात्रोत्सवाच्याआधी देवीची मंचकी निद्री पार पडते.

हे ही वाचा – घटस्थापनेपासून सप्तशृंगी देवी मंदिर होणार खुले

यावर्षी 26 सप्टेंबर 2022 पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. 26 सप्टेंबर रोजी पहाटे तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना होऊन दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येईल. घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या दरम्यान असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -