आजचा रंग लाल : काय आहे लाल रंगाचं महत्त्व!

आजचा रंग लाल

शैलपुत्री देवी पूजा, लाल – नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पुजा केली जाते. असे मानले जाते की, ही देवी सर्व जीवांची रक्षक आहे. शैलपुत्री देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग जोश आणि उल्हासाचा रंग आहे. लाल रंगाला गतिशील, ताकदवान आणि उत्तेजक रंग मानले जाते. उगवत्या सुर्याचा रंग लाल आहे. लाल वस्त्रांमध्ये देवीची पूजा केल्याने मनुष्यात दृढ स्वभाव उत्पन्न होतो.