घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रौत्सव उपवास स्पेशल रेसिपी

नवरात्रौत्सव उपवास स्पेशल रेसिपी

Subscribe

उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी , साबुदाणा वडा, वरईचा भात हे पदार्थ नेहमीच बनवले जातात. त्यातही नवरात्रीत काहीजणांचे नऊही दिवस उपवास असतात. अशावेळी नऊ दिवस उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. पण थोडी कल्पकता वापरून उपवासाचे नवीन पदार्थही बनवता येतात.

उपवासासाठी साबुदाण्याची इडली

- Advertisement -

साहीत्य- ३ वाटी साबुदाणा, २ वाटी वरईचे तांदूळ, दीड वाटी दही, चिमूटभर इनो किंवा चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ, २ चमचे जिरे, दोन चमचा बारीक चिरलेली कोथिंबिर.

सौजन्य-गुगल

कृती- साबुदाणा भिजवून घ्यावा. नंतर साबुदाणा आणि वरई वेगवेगळे मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावे. त्यानंतर एका बाऊलमध्ये हे दोन्ही मिश्रण एकत्र करावे. त्यातदही, मीठ व जिरे, आणि सोडा टाकून एक तास हे मिश्रण झाकून ठेवावे. त्यानंतर इडलीपात्राला तेलाचा हात लावून त्यात इडल्या बनवाव्या. नारळाच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावी.

- Advertisement -

रताळ्याचा किस

साहीत्य- पाव किलो रताळे, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, दोन मोठे चमचे तेल किंवा तूप, पाच सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, तीन चमचे नारळाचा किस, दोन चमचे जिरे.

सौजन्य-यूट्यूब

कृती-सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवावेत. नंतर ते किसून घ्यावेत. कढईत तेल किंवा तूप गरम करावे. त्यात जिऱ्याची फोडणी द्यावी. जिरे तडतडले कि मिरची आणि किसलेले रताळे टाकावे, त्यातील पाणी आटेपर्यंत मंद आचेवर परतत राहावे. नंतर त्यात मीठ, शेंगदाण्याचा कूट, नारळाचा चव टाकावा. पुन्हा एकदा मिश्रण लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यावे. गरमगरमच खाण्यास द्यावे.

उपवासाचे आप्पे
साहीत्य- दोन वाटी साबुदाणा, दीड वाटी वरई तांदूळ, चिमूटभर इनो, ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी दही, दोन टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.

कृती-साबुदाणा आणि वरई दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर त्यात दही व पाणी टाकून एकत्र भिजवा. हे मिश्रण २ तास झाकुन ठेवा. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची घाला. चांगले फेटून घ्या.अप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये एक मिश्रण घाला. एक मिनिटानंतर परतून घ्या. उपवासाचे आप्पे तयार. दह्यासोबत छान लागतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -