घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रोत्सवासाठी सजले दादर मार्केट,खरेदीसाठी लोकांची लगबग

नवरात्रोत्सवासाठी सजले दादर मार्केट,खरेदीसाठी लोकांची लगबग

Subscribe

.मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे महापालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सावध राहण्यासाठी यंदाच्या नवरात्रोत्सवावर काही निर्बंध घातले आहेत.

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने देखील राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नवरात्री निमित्त बाजारपेठेत देखील खरेदीसाठी लोकांची लगबग पाहायला मिळतं आहे. नवरात्रीमध्ये नवरंगांना विशेष महत्त्व असल्याने मुंबईतील दादरच्या मार्केट मद्ये वस्तू, कपडे, साजाटीचे साहित्य खरेदी करण्याचा कल वाढला आहे. यामुळे मार्केट मद्ये नवरात्री साठी विशेष वस्तू,कपडे दाखल झाले आहेत. यामधे नवरात्रीत विशेष पसंती असल्येल्या चानिया चोली, ऑक्साईड ज्वेलरी, आर्टीफीशिअल फुले यांचा महत्वपूर्ण समावेश आहे.

नवरात्री हा सण तरुणाईचा, जल्लोषाचा, उत्साहाचा सण म्हणून संबोधला जातो. यामुळे नवरात्रीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या उत्सवाच्या काळात व्रत वैकल्य करून देवीची मनोभावे सेवा केली जाते. यामुळे देवीच्या सजावटीसाठी भाविक विशेष काळजी घेतात. देवीच्या अरसासाठी बाजारपेठेत विविध तोरण, झेंडूच्या फुलांची माळ,लाईटींग इत्यादी साहित्य सहज उपलब्ध होत आहेत.

- Advertisement -

दरम्यान , राज्य सरकारने यंदाचा नवरात्रोत्सवस गेल्या वर्षीप्रमाणे साधेपणाने साजरा करा असे आवाहन केले असून नियमावली जाहीर केली आहे.मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे महापालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सावध राहण्यासाठी यंदाच्या नवरात्रोत्सवावर काही निर्बंध घातले आहेत. मुंबई महापालिकेने गरबा खेळण्यास आणि देवीचे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत वगळता राज्यभरात गरबा खेळण्याची परवानगी सांस्कृतिक विभागाने दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यभरात गरबा खेळताना नियम आणि अटी पाळण्याचे आवाहन टोपे यांनी केले.

- Advertisement -

 


हे हि वाचा –नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -