घरनवरात्रौत्सव 2022पेशवाईतही केली जात होती नऊ रंगांची उधळण

पेशवाईतही केली जात होती नऊ रंगांची उधळण

Subscribe

नाशिक : नवरात्रोत्सव.. नऊ रात्रींचा उत्सव.. नऊ रंगांचा उत्सव.. या नऊ दिवसांत प्रत्येक वारानुसार दिवसाचा रंग ठरलेला असतो. देवीला त्या-त्या दिवशी त्या विशिष्ट रंगांची साडी नेसवली जाते. त्यानुसार आता स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रीतल्या दिवसांत ठराविक रंगाच्या साड्या नेसतात. या नऊ रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती, असे संदर्भ आढळतात.

२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणार्‍या साड्यांचे रंग वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. मुंबईभरातल्या महिलांनी नऊ दिवस त्या-त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. आता नवरात्रीत वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या ’आजच्या रंगाने’ मुंबई रंगून जाऊ लागली.. लोकल ट्रेन्स, सरकारी बिन-सरकारी ऑफिसेस, महिला मंडळे एवढेच काय हॉस्पिटल्सही या रंगांच्या साड्यांनी रंगून जातात. मुंबईपाठोपाठ, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यांसह महाराष्ट्रभर नवरात्रीच्या नऊ दिवसांत रंगांची ही उधळण सर्वदूर पाहायला मिळते.

- Advertisement -

नऊ रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले असल्याचे जाणकार सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -