राज्यसभेवर सर्वाधिक बिनविरोध उमेदवार भाजपचे, महाराष्ट्रासह चार राज्यात चुरशीची निवडणूक

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेल्याने महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटक याठिकाणी १-१ जागेसाठी चुरशीची निवडणूक होणार आहे.

१५ राज्यांतील ५७ जागांसाठी निवडणूक आयोगाने १० जून रोजी निवडणूक जाहीर केली आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत काही नवे चेहरे समोर आले आहेत तर काही जुनेच चेहरे दिसत आहेत. ५७ पैकी ४१ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. (Rajyasabha election in four states including maharashtra, 41 unopposed candidates elected in 11 states)

कोणत्या राज्यात राज्यसभेच्या किती जागा निवडल्या जातात?

 • उत्तर प्रदेश – 11
 • महाराष्ट्र – 6
 • तामिळनाडू – 6
 • बिहार – 5
 • आंध्र प्रदेश – 4
 • राजस्थान – 4
 • कर्नाटक – 4
 • ओडिशा – 3
 • मध्य प्रदेश – 3
 • तेलंगणा – 2
 • छत्तीसगड – 2
 • झारखंड – 2
 • पंजाब – 2
 • हरियाणा – 2
 • उत्तराखंड – 1

हेही वाचा – कोणत्याही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यास आमदारकी जाणार नाही, पण…

उत्तर प्रदेशमध्ये ११, तामिळनाडूत ६, बिहारमध्ये ५, आंध्र प्रदेशात ४, मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी ३, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी २ आणि उत्तराखंडमध्ये १ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

तर, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक म्हणजे १४ उमेदवार भाजपचे असून काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेसचे प्रत्येकी 4 उमेदवार, द्रमुक आणि बीजेडीचे प्रत्येकी ३, आम आदमी पार्टीचे २, आरजेडी, टीआरएस, एआयएडीएमकेचे प्रत्येकी २, जेएमएम, जेडीयू, सपा आणि आरएलडीचे प्रत्येकी १ आणि अपक्ष कपिल सिब्बल आहेत.

हेही वाचा – विधान परिषदेसाठी सेनेच्या दोन उमेदवारांची निवड, मुंबईच्या सचिन अहिर आणि नंदुरबारच्या आमशा पाडवींचं नाव निश्चित

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेल्याने महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटक याठिकाणी १-१ जागेसाठी चुरशीची निवडणूक होणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सर्वाधिक बिनविरोध

उत्तर प्रदेशमध्ये ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी ८ उमेदवार भाजपचे आहेत. तर आरएलडी आणि अपक्ष उमेदवार कपिल सिब्बल निवडून आले आहेत. भाजपमधून दर्शन सिंह, बाबू राम निशाद, मिथिलेश कुमार, राधा मोहन दल अग्रवाल, के. लक्ष्मण, लक्ष्मीकांत वाजपेयी, सुरेंद्र सिंह नगर, संगीता यादव हे निवडून आले असून रालोदमधून जयंत चौधरी, सपामधून जावेद अली खान निवडून आले आहेत.

बिहारमध्ये सर्व बिनविरोध

बिहारमध्ये पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने तिथे निवडणूत होणार नाही. राजदच्या मीसा भारती आणि फैयाज अहमद, भाजपचे सतीशचंद्र दुबे आणि शंभू शरण पटेल, जेडीयू खैरू महतो यांचा समावेश आहे.

आंध्र प्रदेशमधून वायएसआर काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध

आंध्र प्रदेशमधून वायएसआर काँग्रेसचे व्ही विजयसाई रेड्डी दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आले आहेत. तर, बीडा मस्तान राव, आर कृष्णय्या आणि एस निरंजन रेड्डी यांचीही बिनविरोध निवड झाली. तर, तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि भाजपकडे प्रत्येकी 1 जागा आहे.

पंजाबमध्ये आपची ताकद वाढली

पंबाजमधूनही सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पर्यावरणवादी बलबीरसिंग सीचेवाल आणि उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विक्रमजितसिंग साहनी हे आपचे उमेदवार निवडून आले आहेत. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, राघव चढ्ढा, लवली प्रोफेशनल युनिर्व्हसिटीचे संस्थापक अशोक मित्तल, आयआयटी दिल्लीचे माजी प्राध्यापक संदीप पाठक आणि उद्यागपती संजीव अरोरा हेसुद्धा आपच्या तिकिटावरून राज्यसभेवर गेले आहेत.

छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, ओडिशामध्ये काय परिस्थीत?

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर, झामुमोचे महुआ मांझी आणि भाजपचे आदित्य साहू हे झारखंडमधून बिनविरोध निवडले गेले आहेत. उत्तराखंडमधील भाजपच्या उमेदवार कल्पना सैनी यांचीही बिनविरोध निवड झाली. ४ जुलै रोजी कॉंग्रेस नेते प्रदीप टम्टा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या वरच्या सभागृहात त्यांची जागा घेतील. बीजेडीने ओडिशातील तिन्ही जागा जिंकल्या आणि तेलंगणातील टीआरएसने दोन्ही जागा जिंकल्या.