नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ ग्रंथाचं पठण

हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

दरम्यान, आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

शारदीय नवरात्री 2022 तिथी
प्रतिपदा तिथी प्रारंभ : 26 सप्टेंबर 2022, सोमवार, पहाटे 3.23 पासून ते
प्रतिपदा तिथी समाप्त : 27 सप्टेंबर 2022, मंगळवार, पहाटे 3.08 पर्यंत

शारदीय नवरात्री घटस्थापना शुभ मुहूर्त
26 सप्टेंबर 2022, सोमवार हा नवरात्रीचा पहिला दिवस असून
सकाळी 6.28 ते 8.01 पर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे.
घटस्थापनेचा अभिजीत मुहूर्त
सकाळी 11.54 ते 12.42 पर्यंत असणार आहे.

नवरात्रीमध्ये देवीची अशा प्रकारे पूजा

  • नवरात्री दरम्यान, जेव्हा तुम्ही देवीची पूजा करत असाल त्यावेळी तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करा.
  • नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य द्वारावर दररोज स्वास्तिक चिन्ह तयार करा. मात्र, चिन्ह बनवताना यामध्ये चुना आणि हळदीचा वापर करा. तसेच हे चिन्ह दरवाज्याच्या दोन्ही बाजूला बनवा. तसेच घराच्या चौकटीवर आंबाच्या पानांचे तोरण देखील लावा.
  • पूजेमध्ये सुंगधी फुलांचा वापर करा. तसेच यासोबत वस्त्र, कुंकू, चंदन, साडी, चुनरीचा वापर करा.

नवरात्रीत देवीच्या या ग्रंथाचे करा पठण

  • नवरात्रीमध्ये देवीच्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन केले जाते. या ग्रंथामध्ये देवीचे माहात्म्य कथा सांगितलेली आहे. नवरात्रीत या ग्रंथाचे वाचन केल्यास देवीची असीम कृपा प्राप्त होते.
  • नवरात्रीमध्ये तुम्ही देवीच्या ओम दुम दुर्गायै नमः मंत्रांचा जप देखील करू शकता.
  • नवरात्रीमध्ये तुम्ही देवी चालीसेचे पठन देखील करू शकता.

हेही वाचा :

घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी