घरनवरात्रौत्सव 2022 श्री सप्तशृंगीच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविक नतमस्तक

 श्री सप्तशृंगीच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविक नतमस्तक

Subscribe

सप्तश्रुंगी गडावर देवीच्या अलंकारांची वाजत गाजत निघाली मिरवणूक

नाशिक – महाराष्ट्राचं अर्धशक्तीपीठ असलेल्या श्री सप्तश्रुंगी देवीचरण गुरुवारी (दि.७) शेकडो भाविक नतमस्तक झाले. पहाटे प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते देवीची महापूजा झाली. त्यानंतर दुपारी १२ वाजता आरती आणि त्यानंतर देवीच्या अलंकारांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

पंचामृत अभिषेकानंतर देवीची आरती झाली आणि 11 वाजता घटस्थापना करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी भाविकांना टप्प्याटप्याने बॅरिकेड्समधून सोडलं जात होतं. कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जात होता. प्रवेशद्वाराजवळ ऑनलाईन पासेससाठी भाविकांची गर्दी झाली होती. नवरात्रोत्सवात देवीमंदिर २४ तास खुलं राहणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळांनीही देवीचं दर्शन घेतलं. यावेळी न्यायाधीश अभय वाघवसे यांच्यासह अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश तथा देवी संस्थानचे अध्यक्ष वर्धन पी देसाई उपस्थित होते. ऑनलाईन पासेससाठी वेबसाईट अधून-मधून डाऊन होत असल्यानं भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.

- Advertisement -

खासगी वाहनांना बंदी

नांदुरी येथे मेळा बसस्थानकावर भाविकांची तपासणी केली जातेय. नवरात्रोत्सवादरम्यान गडावरील मार्ग खासगी वाहनांसाठी बंद केला जातो. यंदाही हा मार्ग बंद असल्यानं, गडावर जाण्यासाठी नांदुरी गडपायथ्यापासून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आलीय.

सुविधा आणि नियमावली

  •  बसेसमध्ये केवळ ५० टक्के प्रवाशांनाच परवानगी
  • गडावरील शिवालय तलावात स्नानास मनाई
  • भाविकांसाठी नवरात्रोत्सवात २४ तास मंदिर खुले राहणार
  • भाविकांसाठी भक्तनिवासाची व्यवस्था
  • ऑनलाईन पासेस घेण्यासाठी प्रवेशव्दाराजवळ सुविधा
  • नऊ दिवस मोफत महाप्रसादाची व्यवस्था
  • १० वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्तींसह गर्भवती महिलांना मंदिरात येण्यास मनाई
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -