घरनवरात्रौत्सव 2022शिवध्वज रथयात्रेचा सप्तश्रृंग गडावर प्रारंभ

शिवध्वज रथयात्रेचा सप्तश्रृंग गडावर प्रारंभ

Subscribe

विजयादशमीला होणार कळवणच्या शिवतीर्थावर स्थापना

कळवण : तालुका छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून कळवण येथील नियोजित शिवस्मारकाजवळ स्वराज्याच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या भगव्या शिवध्वजाची प्रतिष्ठापना विजयादशमीला करण्यात येणार असुन त्या पार्श्वभूमीवर हा ध्वज घेऊन गावागावात जाणार्‍या शिवध्वज रथयात्रेचा शुभारंभ पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते श्री सप्तशृंगी निवासिनी गडावर पहिल्या पायरीजवळ पूजन करुन करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा वृषाली शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या पत्नी अनिता भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कळवण शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत बोरसे, स्वप्निल पगार, अविनाश पगार, योगेश अमृतकार, यतिन सोनजे, धनराज पवार, नरेंद्र वाघ, राजेंद्र आहेर, शरद भामरे यांनी सपत्नीक शिवध्वजाची पूजा केल्यानंतर मान्यवरांनी शिवध्वज रथ यात्रेचा शुभारंभ केला. दादा भुसे, अनिता भुसे व वृषाली शिंदे यांचा सत्कार शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी केला.

- Advertisement -

कळवण शहरात उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिवस्मारक उभारणीचे काम सुरू आहे. कामकाजाची सद्यस्थिती शिवस्मारक समितीचे सदस्य अविनाश पगार,राजेंद्र भामरे, राजेंद्र पगार यांनी दिली. गडावर ढोलताशा आणि मराठमोळ्या संबळच्या गजरात ’जय अंबे’चा जयघोष करत शिवध्वज रथाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी शिवध्वजाचे स्वागत केले. गडपासून शिवध्वज यात्रा कळवण तालुक्यातील सर्व गाव,वाड्यावस्तीवर जाणार असुन ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवतीर्थ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिवध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पप्पू बच्छाव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे,सुनील देवरे, राजेंद्र पगार, उपनगराध्यक्ष राहुल पगार,माजी नगरसेवक अतुल पगार, नितीन पगार, माजी उपनगराध्यक्ष जयेश पगार, महाराज युवा फाऊंडेशनचे संस्थापक रोहित पगार, सुधाकर खैरनार, मनीष पगार, सप्तशृंगी गड माजी सरपंच संदीप बेनके, माजी सरपंच राजेश गवळी, अजय दुबे, रंजन देवरे, सुनील गांगुर्डे, दीपक खैरनार, बाळासाहेब गांगुर्डे, छत्रसाल पगार, दिनेश पवार, ललित आहेर, भैय्या पगार, पप्पू नेरकर, योगेश पगार, हरीश जाधव, बंटी पगार उपस्थित होते.

कळवण शहरातील भव्य दिव्य शिवस्मारकाजवळ स्वराज्याच्या अस्मितेचे प्रतीक असलेला १७१ फूट उंच शिवध्वज लावण्यात येणार असून त्यापूर्वी हा ध्वज घेऊन कळवण तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी वस्त्यांमध्ये शिवध्वज रथ जात असून नागरिक स्वागत करत आहेत. विजयादशमीला कळवण येथील शिवतीर्थावर होणार्‍या सोहळ्यासाठी समस्त शिवभक्तांनी उपस्थित राहावे.
– भूषण पगार, अध्यक्ष, छत्रपती स्मारक समिती कळवण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -