Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर नवरात्रौत्सव 2022 शारदीय नवरात्र साजरी करण्यामागे काय आहे पौराणिक कथा?

शारदीय नवरात्र साजरी करण्यामागे काय आहे पौराणिक कथा?

Subscribe

नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

दरम्यान, आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

- Advertisement -

शारदीय नवरात्र साजरी करण्यामागे काय आहे महत्व?
नवरात्र साजरी करण्यामागे अनेक मान्यता आहेत परंचु, यामध्ये सर्वाधिक प्रचलित असलेल्या पौराणिक कथेनुसार, महिषासुर नावाच्या राक्षसाला ब्रह्म देवांनी अमर होण्याचे वरदान दिले होते. त्यामुळे महिषासुर देवतांना खूप त्रास द्यायचा. एके दिवशी महिषासुराच्या अत्याचाराला कंटाळून सर्व देवी-देवता भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्माकडे गेले. तेव्हा सर्वांनी मिळून आदिशक्तीचे आवाहन केले आणि एका दिव्य प्रकाशातून आदिशक्तीची उत्पत्ती झाली. ही आदिशक्ती म्हणजे साक्षात महादुर्गा, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे दिव्य रूप होते. देवी प्रकट झाल्यानंतर देवी आणि महिषासुरामध्ये 9 दिवस युद्ध झाले आणि 10 व्या दिवशी देवीने महिषासुराचा वक्ष केला. असं म्हणतात की, 9 दिवसांदरम्यान सर्व देवतांनी देवीची पूजा-आराधना केली आणि देवीला आपल्या भक्तीने बळ मिळवून दिलं. तेव्हापासूनच नवरात्र साजरी केली जाते आणि या काळात देवी दुर्गेच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. 10 व्या दिवशी देवीला विजय मिळाला म्हणून या दिवसाला विजया दशमी देखील म्हटलं जातं.

या काळात प्रभू श्रीरामचंद्रांनी देखील केला होता रावणाचा वध
याशिवाय नवरात्री आणि दसऱ्याशी संबंधित आणखी एक कथा आहे. रामायणानुसार, राम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा रावणाने सीतेच अपहरण केलं. रावणासोबत सुद्घ करण्यापूर्वी श्रीरामांनी 9 दिवसांचे अनुष्ठान करून देवीचा आर्शिवाद प्राप्त करून घेतला आणि 10 व्या दिवशी रावणाचा वध केला. त्यामुळे हिंदू धर्मात या दिवशी दसरा देखील साजरा केला जातो.


- Advertisement -

हेही वाचा :

नवरात्रीच्या काळात चुकूनही करू नका ‘या’ चार गोष्टी

- Advertisment -