कधी आहे विजया दशमी? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस संपले की 10 व्या दिवशी विजया दशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, विजया दशमीच्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. तसेच घरातील हत्यारांचे पूजन केले जाते. दरम्यान, आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे. नवरात्र संपताच 5 ऑक्टोबर रोजी दसरा देखील साजरा करण्यात येईल.

हिंदू पंचांगानुसार, यावेळी दशमी तिथी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांपासून ते 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 पर्यंत असणार आहे. त्यामुळे दसरा 5 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येईल.

दसऱ्याचा शुभ मुहूर्त

  • विजय मुहूर्त
    5 ऑक्टोबर रोजी 2 वाजून 13 मिनिटांपासून ते 2 वाजून 54 मिनिटांपर्यंत
  • अशुभ मुहूर्त
    5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटांपासून ते 12 वाजून 38 मिनिटांपर्यंत
  • अमृत काळ
    5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 33 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 2 मिनिटांपर्यंत

हेही वाचा :

विजया दशमीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय