घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रीत का परिधान केले जातात 9 रंगाचे कपडे?

नवरात्रीत का परिधान केले जातात 9 रंगाचे कपडे?

Subscribe

नवरात्रीचे 9 दिवस वेगवेगळ्या देवीच्या रूपांची पूजा केली जाते सोबतच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांचे कपडे देखील परिधान केले जातात. असं म्हणतात की, नवरात्रीतले 9 दिवस त्या त्या रंगाचे कपडे परिधान केल्यास विशेष लाभ प्राप्त होतात.

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.

दरम्यान, आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

- Advertisement -

नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळा रंग परिधान करण्याची पद्धत आहे. मात्र खरंतर ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक वारांचे रंग निश्चित केले आहेत. प्रत्येक वाराच्या ग्रहानुसार तो रंग परिधान केला जातो. परंतु रोजच्या आयुष्यात वारानुसार रंग परिधान करणं प्रत्येक व्यक्तिला जमत नाही त्यामुळे नवरात्रीमध्ये वेगवेगळे रंगांचे कपडे परिधान केले जातात.
शिवाय या रंगांमुळे प्रत्येकामध्ये उत्साह संचारतो.

नवरात्रीचे 9 दिवस वेगवेगळ्या देवीच्या रूपांची पूजा केली जाते सोबतच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांचे कपडे देखील परिधान केले जातात. असं म्हणतात की, नवरात्रीतले 9 दिवस त्या त्या रंगाचे कपडे परिधान केल्यास विशेष लाभ प्राप्त होतात.

- Advertisement -

पहिला दिवस- पांढरा

दुसरा दिवस- लाल

तिसरा दिवस- निळा

चौथा दिवस- पिवळा

पाचवा दिवस- हिरवा

सहावा दिवस-राखाडी

सातवा दिवस- नारंगी

आठवा दिवस- गुलाबी

नववा दिवस- जांभळा


हेही वाचा :

नवरात्रीमध्ये कांदा, लसूण का खात नाहीत? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -