घरनवरात्रौत्सव 2022कोरोनाला न घाबरता लोकसेवा करणारी रणरागिणी!

कोरोनाला न घाबरता लोकसेवा करणारी रणरागिणी!

Subscribe

देशभरात लॉकडाऊन सुरु असताना अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच गोष्टी बंद होत्या. एसटी बस, प्रवासी वाहतूक गाड्यांसह देशभरातील रेल्वे सेवा बंद होत्या. अशा आपत्कालीन परिस्थितीतमुलुंडची एक महिला ओला चालक मुंबईत अडकून पडलेल्या दिव्यांग, महिला आणि गरजू लोकांना आपली सेवा देत होती. प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप आणि सुरक्षित पोहचविण्याचे काम त्या करत होत्या. मुलुंडच्या या जिगरबाज वाघिणीचे नाव आहे, विद्या अनिल शेळके. घरात दोन लहान मुले असून देखील त्या भीती न बाळगता या संकटकाळात आपली सेवा महाराष्ट्रातील जनतेला देत होत्या. मुंबई – पुणे, मुंबई – नाशिक, मुंबई- औरंगाबाद, मुंबई – कोल्हापूर असा लांब पल्याचा प्रवास देखील त्या करत होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -