घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा देवी ब्रह्मचारिणीची पूजा; जाणून घ्या पूजा विधी

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा देवी ब्रह्मचारिणीची पूजा; जाणून घ्या पूजा विधी

Subscribe

विद्यार्थ्यांसाठी देवी ब्रह्मचारिणीची पूजा सर्वोत्तम मानली जाते. जर कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास ब्रह्मचारिणीच्या पूजेने कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होतो.

आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणीला ज्ञान, तपस्या आणि वैराग्याची देवी मानले जाते. ब्रह्मचारिणीच्या रूपाची साधना आणि उपासना केल्यास आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर होतात. विद्यार्थ्यांसाठी देवी ब्रह्मचारिणीची पूजा सर्वोत्तम मानली जाते. जर कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास ब्रह्मचारिणीच्या पूजेने कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होतो.

देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी कराल?
सर्वप्रथम सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ होईन देवी ब्रह्मचारिणीची पू़जा करण्याआधी सफेद किंवा पिवळे वस्त्र धारण करा.तसेच या दिवशी देवीला सफेद रंगाच्या विविध वस्तू अर्पण केल्यास भाग्योदय होतो. देवी ब्रह्मचारिणीला तुम्ही पंचामृत अर्पण करा. तसेच पूजेवेळी “ॐ ऐं नमः” या मंत्राचा जप करा.

- Advertisement -

देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्यास होईल भाग्योदय
देवी ब्रह्मचारिणीचे रूप शांत, सौम्य आणि मोहक आहे. पौराणिक मान्यतेनुसार, देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पू़जा केल्यास व्यक्तिला तप, त्याग आणि वैराग्याची प्राप्ती होते. देवीच्या या रूपाची आराधना केल्यास प्रत्येक कामात यश प्राप्त होते.

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा हा उपाय
देवी ब्रह्मचारिणीच्या मंत्रासोबतच चंद्राच्या मंत्रांचा जप देखील सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या कुवतीनुसार देवीला चांदीची वस्तु देखील अर्पण करू शकता. तसेच या दिवशी तुम्ही देवी सरस्वतीची देखील आराधना करू शकता.

- Advertisement -

हेही वाचा :

शारदीय नवरात्र साजरी करण्यामागे काय आहे पौराणिक कथा?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -