घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करा देवी चंद्रघंटाची पूजा

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करा देवी चंद्रघंटाची पूजा

Subscribe

देवी चंद्रघंटाच्या माथ्यावर अर्धचंद्र आहे. त्यामुळे देवीला चंद्रघंटा म्हटलं जातं. देवी चंद्रघंटाच्या हातामध्ये अस्त्र-शस्त्र आहे. देवी चंद्रघंटाची पूजा करणारा व्यक्ति पराक्रमी आणि निर्भय होतो.

आज शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा-आराधना केली जाते. असं म्हटलं जात की, देवी चंद्रघंटाच्या पूजेने साधकाला साहस आणि शक्तीची प्राप्ती होते. नवदुर्गेच्या या रूपाने साधकाच्या जन्म-जन्मांतरीचे पाप नष्ट होतात. देवीचे हे स्वरूप शांतिदायक आणि कल्याणकारी मानले जाते.

देवी चंद्रघंटाचं काय आहे महत्व?
देवी चंद्रघंटाच्या माथ्यावर अर्धचंद्र आहे. त्यामुळे देवीला चंद्रघंटा म्हटलं जातं. देवी चंद्रघंटाच्या हातामध्ये अस्त्र-शस्त्र आहे. देवी चंद्रघंटाची पूजा करणारा व्यक्ति पराक्रमी आणि निर्भय होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, देवी चंद्रघंटाचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला गेला आहे. त्यामुळे देवीच्या आराधनेने मंगळ ग्रह मजबूत होतो.

- Advertisement -

देवी चंद्रघंटाची पूजा कशी कराल?
या दिवशी लाल वस्त्र धारण करून देवी चंद्रघंटाची पूजा करणं उत्तम मानले जाते. देवीला लाल फूल, रक्त चंदन आणि लाल चुनरी समर्पित करा. तसेच यावेळी देवीच्या ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः॥ या मंत्राचा जप करा. देवीला फळांचा, मिठाईचा नैवेद्य अर्पण करा.

आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी करा हे उपाय
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटासमोर बसा. यावेळी लाल वस्त्र धारण करा. देवीला लाल फूल आणि लाल वस्त्र अर्पण करा. देवीच्या ‘ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे’ या नवार्ण मंत्राचा देखील जप करा.

- Advertisement -

हेही वाचा :

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा देवी ब्रह्मचारिणीची पूजा; जाणून घ्या पूजा विधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -