घर नवरात्रौत्सव 2022 नवरात्रीच्या सहाव्या दिवशी अशा प्रकारे करा देवी कात्यायनीची पूजा

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी अशा प्रकारे करा देवी कात्यायनीची पूजा

Subscribe

देवी कात्यायनीचे रूप अत्यंत सुंदर असून ती सिंहावर विराजमान आहे. देवीला चार हात असून एका हातात तलवार तर दुसऱ्या हाताने देवी आपल्या भक्तांना आशिर्वाद देत आहे.

आज शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस आहे. आजच्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा-आराधना केली जाते. कात्यायनी देवीच्या उपासनेने सर्वप्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. देवी कात्यायनीचे रूप अत्यंत सुंदर असून ती सिंहावर विराजमान आहे. देवीला चार हात असून एका हातात तलवार तर दुसऱ्या हाताने देवी आपल्या भक्तांना आशिर्वाद देत आहे.

देवी कात्यायनीची पूजा कशी करावी?

  • नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे.
  • त्यानंतर पूजेला सुरूवात करावी.
  • गंगाजल शिंपडून पूजा स्थळ स्वच्छ करावे आणि एक चौरग ठेवावा.
  • त्यावर वस्त्र अंधरावे आणि त्यावर देवीचा फोटो ठेवावा.
  • त्यानंतर देवीला कुंकू-हळद लावावी, सुगंध फुलांचा हार घालावा. देवीच्या समोर तूपाचा दीवा आणि धूप लावावा.
  • कात्यायनी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा.
  • देवीच्या या देवी सर्वभूतेषु मां कात्यायनी रूपेण संस्थिता।
    नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥ या मंत्राचा जप करावा.
  • त्यानंतर देवीची आरती करावी.
- Advertisement -

कात्यायनी देवीच्या पूजेचे काय आहे महत्व

  • धार्मिक मान्यतेनुसार, देवी कात्यायनीची पूजा-अर्चना केल्याने विवाह होण्यात येणाऱ्या समस्या दूर होतात.
  • देवी कात्यायनीच्या पूजेने कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत होतो.
  • कात्यायनी देवीला मध अर्पण केल्यास सौंदर्य प्राप्ती होते.
  • देवी कात्यायनीच्या साधनेने साधकाला मोक्ष प्राप्ती होते.
  • कात्यायनी देवीच्या पूजेने आरोग्यासंबंधित समस्या दूर होतात.

हेही वाचा :

कधी आहे विजया दशमी? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -