महाअष्टमीला अशा प्रकारे करा देवी महागौरीची पूजा

महागौरीने श्वेत रंगाचे वस्त्र आणि दागिने परिधान केले आहेत. तसेच ती आठ वर्षांची कुमारीका असल्याचं मानलं जातं. देवीचे वाहन वृषभ असून तिला वृषारूढा या नावाने देखील ओळखले जाते.

आज शारदीय नवरात्रीचा आठवा दिवस आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. हिंदू पुराणांनुसार देवी गौरीचा वर्ण गोरा आहे. महागौरीने श्वेत रंगाचे वस्त्र आणि दागिने परिधान केले आहेत. तसेच ती आठ वर्षांची कुमारीका असल्याचं मानलं जातं. देवीचे वाहन वृषभ असून तिला वृषारूढा या नावाने देखील ओळखले जाते.

महागौरी हे देवी पार्वतीचेच एक रूप आहे. पार्वतीने भगवान महादेवांची कठोर तपस्या केल्यानंतर त्यांना पती म्हणून प्राप्त केले होते. त्यानंतर एका पौराणिक कथेनुसार, देवी पार्वती महादेवांवर नाराज होऊन लांब जाऊन तपस्येसाठी बसते. जेव्हा महादेव पार्वतीला शोधतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. पार्वतीचा रंग, वस्त्र आणि अलंकार पाहून ते पार्वतीला गौर वर्णाचे वरदान देतात.

महागौरीच्या उपासनेने साधकाला धन, वैभव, सुख-समृद्धी प्राप्त होते. महागौरीला प्रसन्न करण्यासाठी सर्व मंगल मंग्लये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रयंबके गौरि नारायणि नमोस्तुते या मंत्राचा जप तुम्ही करू शकता.

महागौरीच्या पूजेचे काय आहे महत्व?

  • महागौरीची पूजा-आराधना केल्याने कुंडलीतील सर्व प्रकारचे ग्रह दोष दूर होतात.
  • महागौरीच्या आराधनेने दांपत्य जीवन, व्यापार, धन आणि सुख-समृद्धी वाढते.
  • देवीची मनोभावे पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.

हेही वाचा :

देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महाअष्टमी किंवा महानवमीला कन्यापूजनदरम्यान द्या ‘ही’ भेटवस्तू