घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अशा प्रकारे करा देवी स्कंदमातेची पूजा

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अशा प्रकारे करा देवी स्कंदमातेची पूजा

Subscribe

देवी स्कंदमातेच्या मांडीवर सहा मुख असलेले स्कंदकुमार विराजीत आहेत. देवी स्कंदमाताची पूजा केल्याने पुत्र प्राप्ती होते, तसेच देवीची उपासना करण्याऱ्या व्यक्तींच्या शत्रूंचा विनाश होतो.

आज शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. या दिवशी देवीच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली आहे. हिंदू पुराणानुसार, देवी स्कंदमाता कमळावर विराजमान असते. देवी स्कंदमातेच्या मांडीवर सहा मुख असलेले स्कंदकुमार विराजीत आहेत. देवी स्कंदमाताची पूजा केल्याने पुत्र प्राप्ती होते, तसेच देवीची उपासना करण्याऱ्या व्यक्तींच्या शत्रूंचा विनाश होतो.

कोन आहे देवी स्कंदमाता
देवी स्कंदमाताला चार हात आहेत. तसेच तिच्या मांडीवर स्कंदकुमार विराजमान आहेत. देवी स्कंदमाता कमळावर किंवा सिंहावर विराजमान असते. देवी स्कंदमाता आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होते. त्यामुळे तिला पद्मासना म्हणून देखील ओळखले जाते. असं म्हटलं जाते की, देवीच्या उपासनेने मोक्ष प्राप्ती होते.

- Advertisement -

अशा प्रकारे करा स्कंदमातेची पूजा

  • पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला समर्पित केलेला आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे स्वच्छ वस्त्र धारण करा. पिवळा रंगाने आयुष्यात शांती, पवित्रता ध्यान आणि सकारात्मकता पसरते.
  • देवीची पूजा करण्यापूर्वी घर स्वच्छ करून घ्या, त्यानंतर एका पाटावर पिवळे वस्त्र टाकून त्यावर देवीचा फोटो ठेवा. नंतर देवीला हळद-कुंकू, अक्षता, फुलं समर्पित करा. पिवळी मिठाई अर्पण करा.
  • देवीच्या समोर तूपचा दिवा आणि धूप लावा. देवीची मनोभावे प्रार्थना करा आणि देवीची आरती करून घ्या. त्यानंतर देवीच्या या देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। या स्कंदमाता मंत्राचा जप करा.

हेही वाचा :

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाला खूश करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -