घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र११ बेरोजगारांना मिळाले ३७ लाख रुपये परत

११ बेरोजगारांना मिळाले ३७ लाख रुपये परत

Subscribe

नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची तक्रार केली होती पोलिसांकडे

उत्तर महाराष्ट्रातील ३९ सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी २ कोटी ३८ लाख ९० हजार १०० रुपयांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी वेगाने तपास करत ११ तरुणांना ३७ लाख ३८ हजार रुपये परत मिळवून दिले.

नोकरी लावण्याचे आमिष दाखवत भामट्यांनी तरुणांकडून लाखो रुपये घेतले. प्रत्यक्षात तरुणांना नोकरी दिलीच नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उत्तर महाराष्ट्रातील ३९ तरुणांनी पोलिसांकडे धाव घेतली. आपबिती सांगत मदतीची मागणी केली. यामध्ये नाशिक २२, नंदुरबार ४, अहमदनगर व जळगावमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत फसवणूक करणार्‍यांना शोधून काढले. त्यांच्याकडून ३७ लाख ३८ हजार काढून घेत पोलिसांनी ती रक्कम तरुणांना परत मिळवून दिली.

शेतकरी व बेरोजगार तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक कोणी करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार द्यावी. त्यानुसार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील.
डॉ. प्रताप दिघावकर, विशेष पोलीस महानिरीक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -