घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजळगाव जिल्ह्यात १५ कोटींचे रस्ते मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत जोडणार शेतरस्ते

जळगाव जिल्ह्यात १५ कोटींचे रस्ते मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत जोडणार शेतरस्ते

Subscribe

योजनेंतर्गत जिल्ह्यात ६५ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होणार

जळगाव : मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात ६५ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होणार असून, त्यासाठी तब्बल १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्या शिवारातील रस्ते हे प्रथमच जोडले जाणार असून, त्यामुळे शेतकर्‍यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यात सर्वप्रथम शेत पाणंद रस्ते योजना यशस्वीपणे राबवली. यांच्या अंतर्गत एक किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत होता. तिच्या मदतीने रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. ही योजना अतिशय यशस्वी ठरली. राज्य पातळीवर याचे कौतुक करण्यात आले. राज्य सरकारने ही योजना मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना या नावाने राबवण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने ११ नोव्हेंबर २०११ रोजी मातोश्री ग्राम समृद्धी योजना कार्यान्वित करण्यात आली.

- Advertisement -

या योजनेत रस्त्यांच्या मजबुतीकरणा सोबतच डांबरीकरणाच्या कामाचा समावेश करण्यात आला असून एका किलोमीटरसाठी तब्बल २३ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. शासनस्तरावरून या योजनेच्या कामांना मंजुरी द्यायला सुरुवात करण्यात आली असून, यासाठी जळगाव जिल्ह्यात ६५ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात अंमळनेर तालुक्यातील २० किलोमीटरचे रस्ते, मुक्ताईनगर तालुक्यात १६ किमी, जळगाव तालुक्यात ११ किलोमीटर, धरणगाव १५ तर, पारोळ्यातील ३ किलोमीटर रस्त्यांचा
समावेश आहे.

  • या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले जाणार असल्याने या परिसरातील शेतकर्‍यांची रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. दरम्यान, मातोश्री शेतपाणंद रस्ते योजना मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या मिश्रणातून राबविण्यात येणार आहे. यासाठीचा निधी राज्य रोहयोच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -