घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतोंडात पिस्तुल घालून फोटो काढणे बेतले जीवावर

तोंडात पिस्तुल घालून फोटो काढणे बेतले जीवावर

Subscribe

ट्रीगर दाबला गेल्याने युवक ठार

अहमदनगर : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यासाठी तोंडात पिस्तूल घालून व्हिडीओ तयार करत असताना युवक ठार झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात घडली. प्रदीन पागिरे असे मृताचे नाव आहे. हल्ली अनेक व्यक्ती सर्वप्रथम मोबाईलमध्ये डोकावून व्हॉट्सअ‍ॅपवर काय आले आहे, फेसबुकवर काय चाललेय, इन्स्टाग्रामवर कुणी काय पोस्ट केलीय, आपल्या पोस्टला किती लाईक्स मिळाले हे पाहतात.

एवढेच नव्हे तर अनेक महाभाग लाईक्स मिळविण्यासाठी अनोख्या क्लृप्त्या वापरून फोटो शेअर करतात. अशाच एका फोटोशूट दरम्यान हा प्रसंग एकाच्या जीवावर बेतला. राहुली येथील रहिवासी प्रदीप एकनाथ पागिरे सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यासाठी तोंडात गावठी कट्टा घालून फोटो काढत असताना अचानक गोळी सुटली आणि पागिरे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -