नंदुरबार निवडणूक : भाजपसमोर सेनेचं आव्हान

नंदूरबार जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी दीड वाजेपर्यंत ४२ टक्क्यांवर मतदान

maharashtra grampanchayat election result 2021 big blow to ncp shekap in roha

भाजपची एकहाती सत्ता असलेल्या धुळे जिल्हा परिषदेच्या १५ आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी मंगळवारी (दि.५) मतदान प्रक्रिया पार पडली. यासोबतच नंदुरबार जिल्हा परिषदेसाठीदेखील आज मतदान झालं. नंदुरबार जिल्हा परिषदेत जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर उभं आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी २७ जागा एकट्या भाजपकडे आहेत. उर्वरित २ जागा शिवसेना, ३ जागा राष्ट्रवादीकडे, तर ६ जागा काँग्रेसकडे आहेत. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी दोन जागा लागणार आहेत. त्यामुळे सत्ता आपलीच असेल, असा दावा भाजप उमेदवार धरती देवरे यांनी केला आहे. धुळ्यातील एक जागा शिवसेनेने यापूर्वीच बिनविरोध निवडीच्या माध्यमातून पदरात पाडून घेतलीय. धुळे जिल्हा परिषदेच्या १४ गट आणि २८ जागांसाठी आज पोटनिवडणूक झाली. दरम्यान, अकोला जिल्हा परिषदेच्या १४ आणि पंचायत समितीच्या २८ जागांसाठीदेखील पोटनिवडणुक होते आहे.