Breaking : दौड-मनमाड मार्गावर मालगाडीचे १२ डबे घसरले

सर्व रेल्वेगाड्या मनमाड-नाशिकमार्गे वळवल्या, युद्धपातळीवर डबे उचलण्याचे कार्य सुरू

Derail near Nagar

सोलापूर-दौंड-मनमाड मध्य रेल्वेच्या मार्गावर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा स्टेशनपासून तीन किलोमीटरवर दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे १२ डबे घसरले. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर सर्व रेल्वेगाड्या मनमाड-नाशिक-कल्याणमार्गे वळविण्यात आल्या आहेत.

मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. या अपघातामुळे सोलापूर-दौंड-मनमाड मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या मनमाड-नाशिक-कल्याणमार्गे वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, रेल्वे मार्गावरील डबे रुळावर आणण्यासाठी मध्यरात्रीपासून युद्धपातळीवर कार्य सुरू आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत हा मार्ग रेल्वे गाड्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

वळवण्यात आलेल्या प्रमुख रेल्वे अशा

निझामऊद्दी-गोवा
अहमदाबाद-यशवंतपुरम
जम्मुतावी-पुणे
निझामऊदीन-वास्को
अजनी(नागपूर)-पुणे