Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र कन्नड येथे व्यावसायिकाच्या घरी दरोडा

कन्नड येथे व्यावसायिकाच्या घरी दरोडा

दोघा चोेरट्यांना पकडण्यात यश

Related Story

- Advertisement -

खांडसरी परिसरात राहणार्‍या जयकुमार वर्धमान जैन या लोखंड व शेती साहित्य विक्री करणार्‍या व्यापार्‍यांच्या घरी दरोडा घालण्यात आला. यातील दोघा चोेरट्यांना पकडण्यात यश आले आहे. जैन हे आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासह राहतात. त्यांच्या बंगल्याला तळमजला असून वर दोन मजले आहेत. साडेपाच वाजेच्या सुमारास जैन कुटुंबातील सदस्य पहिल्या मजल्यावरील ऑफिसमध्ये सालदारासोबत बसलेले असताना पाच दरोडेखोरांनी विजयकुमार वर्धमान जैन यांच्या बंगल्यात प्रवेश करत चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ केली. मात्र, आरडाओरडा करताच दरोडेखोरांनी मोबाईल आणि ८० हजारांची सोन्याची चेन असे एकूण एक लाख पंधरा रुपयांचा ऐवज घेत पळ काढला. पाच दरोडेखोरांपैकी दोघांना परिसरातील नागरिकांसह ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार संजय अटोळे, सुरेश शिंदे, विजय चौधरी, जे. डी चव्हाण यांनी पाठलाग करून पकडले.

- Advertisement -