सिंहाच्या व्हायरल व्हिडिओने दहशत, देवळा वासियांच्या उरात धडकी

सोशल मीडियावर सिंहसदृश्य प्राण्याबाबत संचार

देवळा तालुक्यातील दहिवड गावात सध्या सिंहसदृश्य प्राण्याचा संचार असल्याची चर्चा आहे. परिसरातील नागरिकांनी हिंस्र प्राण्यांचे वर्णन केल्या नुसार वन विभागाने दखल घेतली आहे. हा  प्राणी नेमका कोणता आहे हे स्पष्ट झालेले नसले तरी नागरिकांनी घाबरून न जाता, काळजी घेणं गरजेचं आहे. नागरिकांनी आपली जनावरे लहान बालके, वृध्द माणसांसह सगळ्यांनीच काळजी घेण्याचं आवाहन वन विभागासह प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर यांनी केलंय.

या हिंस्र वन्य प्राण्यांबाबत देवळा तालुकाच नाही तर आसपासच्या परिसरातही चर्चा होते आहे. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेशी संबंध नसलेले दोन वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल होता आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यातील एक व्हिडिओ गीर अभयारण्यात असल्याचं कळवण वन विभाग अधिकाऱ्यांनी सांगिलले आहे. लोकांमध्ये दहशत पसरवणारे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांचे मोबाईल नंबर देवळा पोलिस स्टेशनला पुराव्यांसह मिळाले आहेत. अशा व्यक्तींचे मोबाईल जप्त करून लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. देवळा वन विभाग सर्तकतेने याप्रकरणाचा पाठपुरावा करत असुन असे चुकीचे व्हिडिओ शेअर न करण्याची विनंची त्यांनी केली आहे.