घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसरकारी नोकर पतसंस्थेच्या निवडणुकीत राडा; सदस्यांची पळवापळवी

सरकारी नोकर पतसंस्थेच्या निवडणुकीत राडा; सदस्यांची पळवापळवी

Subscribe

बँकेच्या निकाल त्रिशंकू परिस्थिती असताना निवडणूक लढवलेल्या सर्वच गटांची मोठी तारांबळ उडालेली दिसून आली

जळगाव : आशिया खंडातील सर्वाधिक नावलौकिक असणारी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या पतसंस्थेच्या चेअरमनपदाची निवड आज होत असताना सहकार गटाने लोकसहकारच्या गटाच्या दोन सदस्यांना पळवून लावण्याने मोठा गोंधळ उडाला. या गोंधळामुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झाले होतं. पण पोलिसांच्या मध्यस्तीने संबंधित प्रकरण निवळले.

सहकार गट, लोकसहकार गट आणि प्रगती शिक्षक सेना अशा तीन गटाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत एकाही गटाला बहुमत मिळाले नाही. या निवडणुकीत सहकार गटाचे 9, प्रगती शिक्षक सेनेचे 6 आणि लोकसहकार गटाचे 6 उमेदवार निवडून आले. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीतून सहकार गटाने जी राजकीय खेळी केली त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. या दरम्यान प्रगती शिक्षक सेना आणि लोकसहकार गटाने युती करून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. मात्र लोक सहकार आणि प्रगती शिक्षक सेनेचे चक्क दोन संचालकांनी सहकार गटात जाऊन बंडखोरी केली. त्यामुळे लोकसहकार आणि प्रगती गटाच्या चिडलेल्या कार्यकर्त्यांनी बंडखोरांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आमचे दोन सदस्य आमच्या ताब्यात द्या. अन्यथा आम्ही निवडणूक प्रक्रिया होऊ देणार नसल्याचा पवित्रा लोकसहकार आणि प्रगती गटाच्या वतीने घेण्यात आला होता. एकमेकांच्या अंगावर दोन्ही गटातली पदाधिकारी व संचालक धाऊन गेल्याने प्रचंड तणावाचे वातावरण झाले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून देखील वाद कमी होत नव्हता. मात्र पोलिसांनी मोठा फौजफाटा घटनास्थळी पाचारण केला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात बंडखोर नवनिवृत संचालकांना चेअरमनपदाच्या निवड प्रक्रियेसाठी बँकेमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.

- Advertisement -

बँकेच्या निकाल त्रिशंकू परिस्थिती असताना निवडणूक लढवलेल्या सर्वच गटांची मोठी तारांबळ उडालेली दिसून आली आहे. निकाला दरम्यान सहकार गटाचे 9, प्रगती शिक्षक सेनेचे 6,लोकसहकार गटाचे 6 असे मताधिक्य होते. मात्र सहकार गटाने प्रगती शिक्षक सेनेच्या 2 संचालकांनी बंडखोरी केल्याने सहकार गटाचा विजय निश्चित मानला जात आहे. लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेनेकडून ग.स. बँकेमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता. मात्र दोन संचालकांनी बंडखोरी केल्याने अखेर तो फोल ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -