घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलसीकरणासाठी नंबर लावण्यावरून राडा

लसीकरणासाठी नंबर लावण्यावरून राडा

Subscribe

धरणगाव केंद्रावरील प्रकार, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना फटका

धरणगाव – कोरोनावर मात करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस नागरिकांना उपयोगी ठरत आहे. त्यामुळे नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांचाही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, लसींच्या अपुर्‍या साठ्यामुळे प्रत्येकाची लसीकरणासाठी घाईगर्दी दिसून येत आहे. अशाच गर्दीतून धरणगाव येथील एका केंद्रावर लसीकरणासाठी नंबर लावण्यावरून युवकांमध्ये चांगलाच राडा झाला. यामुळे लसीकरण काही वेळ ठप्प झाले होते.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव बसस्थानकाशेजारी असलेल्या लसीकरण केंद्रावर शनिवारी (दि.३) दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली. लसीकरण केंद्रावर नंबर लावण्यावरून ही हाणामारी झाली. दरम्यान, ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होत असून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार सुज्ञ नागरिक करत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसर्‍या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहेत. तरुण आणि वयोवृद्ध नागरिक एकत्र लसीकरणाला येत असल्याने मोठी गर्दी होत असून नियोजनाअभावी गोंधळ उडत आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून दोन जणांमध्ये चक्क हाणामारी झाली. या गोंधळामुळे काही काळ लसीकरण ठप्प झाले होते. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस आल्यानंतर काही वेळाने लसीकरण सुरू झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -