घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवनक्षेत्रातील चार शिकारी अटकेत

वनक्षेत्रातील चार शिकारी अटकेत

Subscribe

भाला, कोयता, वेळूच्या काठ्या, दुचाकी जप्त

जिल्ह्यातील वनक्षेत्रातील झाडांची पाणगळी सुरु असल्याने जंगल विरळ झाले आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ भटकंती असतानाच शिकारी दबा धरुन बसत असल्याने वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. मंगळवारी (दि.२५) रोजी अंजनेरी हद्दीतील तळवाडे येथील राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करून वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी वाघर लावणार्‍या चौघांना वनविभागाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून हत्यारे भाला, कोयता, वेळूच्या काठ्यांसह दुचाकी जप्त करण्यात आली.

अंधारवाडी, बेझे अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील विठ्ठल मंगळ भुरभुडे (वय ३४), रामा गणपत लोथे (४८), रामदास गोविंद सराईत (४५) व तळेगाव (काचुली, ता. त्र्यंबकेश्वर) येथील सोमो भिवा पारधी (४५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

अभारण्यात विनापरवाना प्रवेश करणे वन्यजीव कायद्याने गुन्हा आहे. तरीही, वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारींकडून प्रवेश केला जात आहे. उन्हाळ्यामुळे जंगलातील पाण्याचा स्त्रोत कमी झाला आहे. तहान भागवण्यासाठी वन्यप्राणी भटकंती करत आहेत. मात्र, शिकारी वन्यप्राण्यांची वाघर लावून शिकार करत आहेत. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना तळवाडे शिवारातील जंगलात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी वाघर लावल्याचे दिसून आले. त्यानुसार वनविभागाने चौघांना अटक केली. याप्रकरणी वनविभागाने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वनविभागातर्फे संशयित चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना ४ दिवसांची वनकोठडी सुनावली. पुढील तपास उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखालील विवेक भदाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक प्रादेशिक सुजित बोकडे, वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आहेर, संतोष चव्हाण करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -