घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतुम्ही म्हणजे सगळे ओबीसी नाहीत, गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना सुनावले

तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी नाहीत, गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना सुनावले

Subscribe

जळगाव : भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत, असा आरोप केला आहे. भाजपा नेते व विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना संधी मिळेल, असे वाटत होते. मात्र त्यांना तिथे संधी मिळाली नाही. त्यानंतर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यावरून पंकजा मुंडे यांनी, वरिष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नसेल, असा टोला लगावला आहे.

- Advertisement -

पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि सध्या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी यावरून भाजपावर टीका केली आहे. जे जे लोक गोपनाथ मुंडे यांच्याजवळचे आणि त्यातही ओबीसी नेते आहेत ते ते बाजूला पडले आहेत. यात माझा व पंकजा मुंडे यांचा समावेश आहे, अशी टीका खडसे यांनी केली आहे.

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या या टीकेला प्रत्यु्त्तर दिले आहे. मी आणि गुलाबराव पाटील ओबीसी आहोत. आमच्या दोघांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे. त्यामुळे सरकारने ओबीसींवर अन्याय केला, हा एकनाथ खडसेंचा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी समाज आहे, असे समजण्याचे कारण नाही. ‘तू-तू, मैं-मैं’ करण्यापेक्षा आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्यावा. तुम्ही फक्त शांत राहा, असे त्यांनी सुनावले आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या होत्या पंकडा मुंडे?
ज्यावेळेस मंत्रिमंडळ बनत असते तेव्हा सर्वांना समाधानी करणे शक्य नसते. त्यामुळे जे मंत्री झाले त्यांनी तरी लोकांचे समाधन करावे, अशा शुभेच्छा मी नव्या मंत्र्यांना दिल्या आहेत. सतत चर्चेत असलेले माझे नाव आहे. पण अजूनही माझी पात्रता त्यांना वाटत नसेल. त्यामुळे मला मंत्रीपद दिले नसेल. जेव्हा त्यांना माझी पात्रता वाटेल तेव्हा ते मंत्रीपद देतील. त्याबद्दल मला आक्षेप नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -