घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रघाटघर, रतनवाडीत पावसाचा धुमाकूळ

घाटघर, रतनवाडीत पावसाचा धुमाकूळ

Subscribe

भंडारदरा ८०, मुळा धरण ५५ टक्के भरले

जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर व रतनवाडीत पावसाचा रुद्रावतार पहायला मिळाला. अवघ्या चोवीस तासांतच या दोन्ही ठिकाणी जवळपास सात इंच पावसाची नोंद झाली आहे. मुळा खोर्‍यातील हरिश्चंद्रगड व कृष्णवंतीच्या खोर्‍यातील कळसूबाईच्या शिखरांवरही पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील या तिनही मोठ्या धरणांत पाण्याची आवक वाढली. गेल्या चोवीस तासात भंडारदरा धरणात हंगामात दुसर्यांदा विक्रमी ७०९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. कृष्णवंतीच्या खोर्‍यातील पावसाने वाकीचा फुगवटा वाढवल्याने निळवंड्यातील आवकही वाढली आहे.

पावसाने भंडारदर्‍याचा निसर्ग फुलल्याने परिसरात पर्यटकांची रेलचेलही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर भंडारदरा जलाशयातून म्हणजे अंब्रेला फॉल मधून दुपारी पाणी सोडण्यात आले .त्यामुळे आंब्रेला अवतरला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भंडारदर्‍याच्या पाणलोटातील वातावरणातही मोठे बदल झाल्याचे दिसत आहे. सह्याद्रीच्या उंचच उंच शिखरांच्या कड्यात विसावलेले धरणाचे पाणलोट क्षेत्र दाट धुक्यात हरवले आहे. भंडारदर्‍यात १६३ मिलीमीटर तर निळवंड्याच्या पाणलोटातील वाकीत १५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता भंडारदर्‍याचा पाणीसाठा ७८.७७ टक्क्यांवर पोहोचला असून, धरणात सुरु असलेली पाण्याची आवक अशीच सुरु राहिल्यास सायंकाळपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा ९ हजार दशलक्ष घनफूटाच्या पुढे सरकण्याची आहे. समाधानकारक पाणी जमा झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -