घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहिंगणघाटमधील निवासी शाळेत ७५ विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात

हिंगणघाटमधील निवासी शाळेत ७५ विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात

Subscribe

पालकांची चिंता वाढली

राज्यात मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केला होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यासह देशातील सर्वच शाळा बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ऑनलाईन शिकवणी सुरु करण्यात आली होती. परंतु मागील २ महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारनेही शाळा पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून ५वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे असलेल्या निवाशी शाळेत एकूण ७५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. निवाशी शाळेतील विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने पालकांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे.

हिंगणघाटमधील निवासी शाळेतील ३० विद्यार्थ्याचा कोरोना चाचणी अहवाल बुधवारी सकारात्मक आला तर गुरुवारी ४५ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. या विद्यार्थ्यांनी अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने एकूण २४७ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये १ विद्यार्थी आणि ९ कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल प्रतिक्षेत आहेत.

- Advertisement -

या विद्यार्थ्यांना शाळेतील वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांवर तिथेच उपचार केले जात आहे. काही विद्यार्थ्यांना सौम्य लक्षणे असल्याचे आढळले आहे. निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाची चांगलेच तारांबळ उडाली आहे. परंतु अनेक पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा शाळा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वसतीगृहातील एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली होती. हा विद्यार्थी एका खाजगी डॉक्टरकडून उपचार घेत होता. या विद्यार्थ्यामुळेच इतर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. राज्यात ५ वी ते १० वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -