Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल कसा

त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल कसा

मागासवर्गीय महिलेसह कुंटुंबियांना अमानुष मारहाण,

Related Story

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील मागासवर्गीय महिलेसह कुटुंबियांना अमानुषपणे बेदम मारहाण केल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असतांना दुसर्‍या गटाकडून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी पोलिसांच्या विरोधात शनिवारी (दि.४) सकाळी ११ वाजता वंचित बहूजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढून नेवासा पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चाचे नेत्तृत्व वंचित बहूजन आघाडीचे युवानेते संजय सुखधान यांनी केले या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन जाधव, मनसेचे युवानेते विलास देशमुख, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष मुन्ना चक्रणारायण, भेंडा खुर्दचे सरपंच सुनील खरात, रिपाइंचे शामराव सोनकांबळे, सुनील वाघमारे, घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी भालेराव, हरिश चक्रणारायण, विजय गायकवाड यांच्यासह असंख्य दलित चळवळीतील भिमसैनिक या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना वंचित बहूजन आघाडीचे युवानेते संजय सुखधान म्हणाले की, कुकाणा येथे अतिक्रमनाच्या वादातून गोर्डे कुटुंंबियांतील महिलेसह त्यांच्या कुटुंबियांना अमानुषपणे मारहाण झालेली होती. या घटनेचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झालेला असतांना मारहाण करणार्‍या नराधमांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घ्या, पैसे देतो नाहीतर तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करु अशी धमकी देवून प्रत्यक्षात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अन्याय, अत्याचार करुन मागासवर्गीयांना पैसे देवून अत्याचार करण्यासाठी या गांवगुंडांना कोणाचा राजाश्रय लाभला? असा सवाल सुखधान यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या भाच्यांनी मागासवर्गीय महिलेसह तीच्या कुटुंबियांना मारहाण केली हा व्हिडीओ संपूर्ण जिल्ह्यात प्रसारित झालेला असतांना नेवासा पोलिसांनी आरोपींना अटक न करता त्यांचीच फिर्याद घेत मागासवर्गीय कुटुंबियांवर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागिय पोलीस अधिकारी मागासवर्गीय समाजातील मंडळींवर झालेल्या अन्यायाप्रकरणी आरोपींना अटक करण्याचे आदेश देण्याऐवजी आरोपींशीच पडद्या आडून हितगुज करत असल्याचा आरोप करुन त्यांच्या तपासाविषयी आम्हाला संशय आहे, असेही यावेळी सुखधान यांनी स्पष्ट केले.

पोलीस नेमके कोणाच्या इशार्‍यावर कर्तव्य निभावतात, त्यांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत, आरोपींना तत्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.यावेळी शामराव सोनकांबळे, सुनील वाघमारे, हरिश चक्रणारायण, विजय गायकवाड, दीपक गायकवाड यांची भाषणे झाली. या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य राहुल वाघमारे, स्वप्निल सोनकांबळे, पप्पू कांबळे, बाबासाहेब साळवे, आलम पिंजारी, राजू साळवे, फ्रन्सिस जाधव, सुजित गोर्डे, नितीन भालेराव, सुनील हिवाळे, राहुल चाबुकस्वार, विशाल राजगुरु यांच्यासह मोठ्या संख्येने भिमसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisement -