घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक विभागात ९.७७ लाख रुग्ण कोरोनामुक्त ; मृत्यूदर २ टक्के

नाशिक विभागात ९.७७ लाख रुग्ण कोरोनामुक्त ; मृत्यूदर २ टक्के

Subscribe

नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक

नाशिक:ओमिक्रॉन विषाणूने सर्वांनाच धडकी भरली आहे. मात्र, या भीतीच्या सावटातही नाशिककरांसाठी एक चांगली बातमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागात आजपर्यंत 9 लाख 98 हजार 560 रुग्णांपैकी 9 लाख 77 हजार 400 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत 1 हजार 61 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात 20 हजार 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.88 टक्के आहे, तर मृत्युदर 2 टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 12 हजार 369 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 4 लाख 03 हजार 182 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 464 रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 723 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 टक्के आहे.

- Advertisement -

नगर : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.84 टक्के

जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 57 हजार 270 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 3 लाख 49 हजार 566 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 581 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, बरे होण्याचे प्रमाण 97.84 टक्के इतके आहे. आजपर्यंत 7 हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर 1.99 टक्के आहे.

जळगाव : बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के

जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 799 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 40 हजार 212 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 08 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार
सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के इतके आहे. आजपर्यंत 2 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 1.80 टक्के आहे.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -