Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र एन पावसाळयात कोटमारा धरणाने गाठला तळ

एन पावसाळयात कोटमारा धरणाने गाठला तळ

स्थानिक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण

Related Story

- Advertisement -

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुटवाडी येथील कोटमारा धरण हे अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सद्यस्थितीत धरणातील पाण्याने तळ गाठल्याने कुरकुटवाडीसह आंबीदुमाला, बोटा आदी गावांतील शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहेत.१५५ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या कोटमारा धरणावर कुरकुटवाडी गावासह आंबीदुमाला, बोटा आदी गावांचे भवितव्य अवलंबून असते. दरवर्षी हे धरण पावसाळ्यात ओसांडून वाहत असते. गेल्या वर्षी देखील ओसंडून वाहिल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

यंदा मात्र ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तरी अध्यापही धरणात पाणी येईना. सद्यस्थितीत धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसह धरणाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.याचबरोबर आंबीखालसा येथील गणपीरदरा व ढोरवाडी या दोन्ही लघु प्रकल्पांसह पाझर तलाव, सिमेंट बंधारे, साखळी बंधारे तुडूंब भरून वाहात असतात पण त्यांच्या मध्येही म्हणावा तसे पाणी नाही जोपर्यंत धो धो पावसाची बरसात होणारी नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याने शेतकर्यांवर चिंतेचे ढग दाटले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

- Advertisement -