घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचायला लावले; पोलिसांवर आरोप

वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचायला लावले; पोलिसांवर आरोप

Subscribe

जळगाव महिला अत्याचार प्रकरणी चौकशी समिती गठित

जळगाव येथील महिला वसतिगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याच्या धक्कादायक प्रकाराचे पडसाद विधीमंडळात उमटले. या  प्रकरणाची दखल घेत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चार उच्चस्तरीय अधिकार्‍यांची समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई होईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जळगावच्या आशादीप वसतिगृहातील महिला आणि मुलींना काही जणांनी डान्स करायला लावल्याचा प्रकार समोर आला होता. या महिलांनी घडलेल्या प्रकाराची शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्याने ही संपूर्ण घटना उघडकीस आली. या महिलांनी आपल्यावर अन्याय, अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करत असल्याचे म्हटले आहे. इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

आशादीप वसतिगृह काय आहे?
जळगावातील ‘आशादीप महिला शासकीय वसतिगृह’ ही संस्था विधवा, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसेच कुमारी माता, मुली, अनाथ मुले यांना आधार देते. त्यांच्या फक्त समस्या सोडवण्यापुरते हे मर्यादित नसून अनेक मुलींचे संसार याद्वारे थाटले गेले आहेत. 1983 मध्ये या वसतिगृहाची स्थापना शहरात करण्यात आली. तर 2006 पासून यास आश्रयगृह म्हणून घोषित करण्यात आले. आज येथील महिला व मुली स्वबळावर उभ्या राहण्याचे प्रशिक्षण घेत असून यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

प्रतिक्रिया
या घटनेचा संदर्भात आपल्याकडे काही जणांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार आपण चौकशी समिती गठीत केली असून ही चौकशी समिती संपूर्ण घटनेचा तपास करून अहवाल देणार आहे. या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल.
– अभिजित राऊत, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -