घरउत्तर महाराष्ट्रअहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता

अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता

Subscribe

शिवसेनाचा महापौर, राष्ट्रवादीचा उपमहापौर

अहमदनगर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अहमदनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणे शेंडगे तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली. दोघांचेही एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या सभेत बिनविरोध निवडीची घोषणा केली.

अहमदनगर महापालिकेचे महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाली. त्यामुळे दोन्ही पदासाठी एकच अर्ज दाखल झाले. महापौरपदासाठी भाजपकडे उमेदवार नव्हता तर उपमहापौर पदासाठी देखील अर्ज केला नाही. त्यामुळे या निवड प्रक्रियेची केवळ औपचारिकता राहिली होती. ही औपचारिकता पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पार पाडली. शेंडगे यांना नगरसेविका पुष्पा बोरुडे व अनिल शिंदे आणि उपमहापौर भोसले यांना नगरसेवक कुमारसिंह वाकळे व समद खान सूचक अनुमोदक होते. शहरातील महिलांच्या आरोग्यावर आणि पाणी प्रश्नावर काम करणार असल्याचे नूतन महापौर शेंडगे यांनी सांगितले. तर शहराला हरित करण्यासाठी काम करणार असल्याचे उपमहापौर गणेश भोसले यांनी सांगितले. महापालिकेत शिवसेनेचे २३, राष्ट्रवादी १८, भाजप १५, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ आणि अपक्ष २ असे एकूण ६८ पक्षीय बलाबल आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी

शिवसेनेचा महापौर निवडीची घोषणा होण्याआधी मंगळवारी मध्यरात्री शिवसेनेच्या दोन गटांत राडा झाला. या निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवार भाकरे यांच्या पतीला मारहाण झाल्याची तक्रार आहे. अन्य नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे भाकरे यांनी उमेदवारी न मिळाल्याने तोडफोड केल्याचे दुसर्‍या गटाचे म्हणणे आहे. हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -