घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘वोक्हार्ट’ची परवानगी रद्द करण्याचा महापौरांचा इशारा

‘वोक्हार्ट’ची परवानगी रद्द करण्याचा महापौरांचा इशारा

Subscribe

जितेंद्र भावे यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाचा ‘इफेक्ट’

रुग्णाच्या उपचारानंतर एक लाख ४० हजारांची अनामत रक्कम अडवल्याप्रकरणी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित व्होक्हार्ट रुग्णालयाचा सविस्तर अहवाल लेखापरीक्षकांकडून मागवला आहे. त्याच्या अभ्यासानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे या रुग्णालयाची चौकशी करू, वेळप्रसंगी परवानगीही रद्द करण्याचा इशारा महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिला आहे.

रुग्णांच्या उपचारानंतर बिलाचे सर्व पैसे देऊनही अनामत रक्कमेपोटी भरलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ करणार्‍या वोक्हार्ट रुग्णालयात ऑपरेशन हॉस्पिटल मोहिमेंतर्गत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्यासह रुग्णाच्या नातेवाईकांनी मंगळवारी (दि. २६) अर्धनग्न अंदोलन केले. त्याचे पडसाद बुधवारी (दि. २७) दिवसभर शहरात उमटले. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. संबंधित आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या लेखापरीक्षकांकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तर महापौरांनी मात्र हॉस्पिटलला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

पोलीस म्हणतात अनामत रक्कम दिली!

तक्रारदार अमोल जाधव यांच्या तक्रारीवरुन जितेंद्र भावे यांनी कपडे काढत आंदोलन केले होते. बुधवारी मात्र जाधव यांचा मोबाईल दिवसभर बंद होता. त्यांच्या आई-वडिलांची प्रकृती ठिक नसल्याने ते रुग्णालयात गेले नाहीत. मात्र, रुग्णालय व्यवस्थापनाने जाहीर केल्यानुसार १ लाख ४० हजारांची अनामत रक्कम सायंकाळपर्यंत तक्रारदाराच्या खात्यात जमाच न केल्याचा दावा भावे यांनी केला आहे. संबंधित रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा झाली असून त्याची पोहोच पावती आपल्याला प्राप्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -