घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसाईमंदिर सुरू न झाल्यास मनसेचा घंटानाद आंदोलन

साईमंदिर सुरू न झाल्यास मनसेचा घंटानाद आंदोलन

Subscribe

मंदिर सुरु न केल्यास साई मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला इशारा

साई मंदिर बंद असल्याने भाविकांना दर्शनाला मुकावे लागत असून शिर्डी व परिसरातील नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. यासर्व घटकांना दिलासा देण्यासाठी मंदिर लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा साई मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्य भरात मंदिरे सुरू करण्यासाठी घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले. त्या अनुषंगाने राहाता तालुक्यातील मनसे पदाधिकार्‍यांनी साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनानिवेदन देत पुढील आठ दिवसात मंदिर सुरू कर ण्याची मागणी केली आहे. साईबाबा हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असून मंदिर बंद असल्यामुळे शिर्डीची आर्थिक उलाढाल पूर्ण ठप्प झाली आहे. आपण कोरोनाच्या नावाखाली मंदिर बंद करून ठेवले आहेत, मात्र राज्यांमध्ये ठीकठिकाणी आंदोलन होत आहे.

- Advertisement -

तसेच ठीकठिकाणी विविध पक्षांचे कार्यक्रमदेखील चालू आहे.त्या माध्यमातून लोकांना कोरोना होत नाही का? हा संशोधनाचा एक भाग आहे. शिर्डी मंदिरावर सर्व पंचक्रोशीतील व्यावसायिक, फुल उत्पादक शेतकरी व साफसफाई आणि इतर कंत्राटी कामगार अवलंबून आहेत. मंदिर बंद असल्यामुळे सर्वांना आर्थिक फटका बसला आहे अने कांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत त्यामुळे लवकरात लवकर साईबाबा मंदिर सुरू केले नाही तर मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष राजेश लुटे, उपतालुकाध्यक्ष गणेश जाधव, प्रशांत वाकचौरे, मनविसे जिल्हाध्यक्ष विजय मोगले, शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, प्रसाद महाले, दीपक पवार, अजिंक्य गाडेकर आदींसह कार्यकर्त्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -