घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपैसे न दिल्याच्या कारणातून हत्या

पैसे न दिल्याच्या कारणातून हत्या

Subscribe

चार तृतीय पंथियांसह साथीदार गजाआड

राहता तालुक्यातील गणेशनगर फाटा येथे पैसे न दिल्याच्या कारणावरून रस्त्याने जाणार्‍या प्रवाशाची हत्या करणार्‍या चार तृतीयपंथी आरोपींसह त्यांच्या आणखी चार साथीदारांना बारा तासांच्या आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ५ सप्टेंबर रोजी फिर्यादी महेश दिलीप आभाळे (वय २३, धंदा- खासगी नोकरी, रा. आभाळे वस्ती, एकरुखे, ता. राहाता यांचे वडील दिलीप आभाळे व त्यांचे मित्र निवृत्ती ऊर्फ नंदू चांगदेव क्षिरसागर असे दोघे गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाटा येथे काही तृतीय पंथियांनी दिलीप आभाळे यांना अडवून पैशाची मागणी केली. त्यावरुन तृतीयपंथी व आभाळे यांच्यात वाद झाले. त्याचा राग मनात धरुन तृतीय पंथीयांनी त्याच दिवशी त्यांचे इतर साथीदारासह एकरुखे गावामध्ये जावून फिर्यादीचे वडील दिलीप आभाळे व निवृत्ती ऊर्फ नंदू चांगदेव क्षिरसागर यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

- Advertisement -

त्यानंतर दिलीप आभाळे यांच्यावर औषधोपचार चालू असताना १६ सप्टेंबर रोजी ते मयत झाले. याबाबत मुलगा महेश दिलीप आभाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गु.नं. १२५१/२०२१, भादवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे आरोपी सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार, रा. श्रीरामपूर व त्याचे नऊ साथीदाराविरुध्द दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यांनतर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग, पो नि. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी एकरुखे, ता. राहाता येथे भेट देवून घटनेची व आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सोपान गोरे, मन्सूर सय्यद, भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, मनोहर गोसावी, शंकर चौधरी, दिलीप शिंदे, रवी सोनटक्के, संतोष लोढे, विनोद मासाळकर, रोहिदास नवगिरे, मयूर गायकवाड, संभाजी कोतकर यांच्या पथकाने मिळून गुन्ह्यातील आरोपींचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून व मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीतांचा शोध घेवून आरोपी सचिन उत्तम जाधव उर्फ संचिता तमन्ना पवार (वय २६, रा. सुभाष कॉलनी, वॉर्ड नं. ६, श्रीरामपूर यांस ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -