Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या, जतेगाव घाटातील प्रकार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या, जतेगाव घाटातील प्रकार

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्यावर सोमवारी (दि.३०) रात्री पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

रेखा जरे पुण्यावरून अहमदनगरला येत होत्या. त्या जतेगावच्या घाटात असताना त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या जरे यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल कण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्या मृत झाल्याचे घोषित केले. गाडीला कट मारल्याचा कारणावरून जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली. त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -