Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र राहुरीत पाचवर्षीय मुलीसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या

राहुरीत पाचवर्षीय मुलीसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या

दोन दिवसांपासून गायब मायलेकींचा मृतदेह सापडला विहिरीत

Related Story

- Advertisement -

तालुक्यातील टाकळी मिया येथे दोन दिवसापासून गायब असलेल्या मायलेकांनी एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा सिद्धी दिलीप कडू (वय 5) हिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले होते. तर विद्या दिलीप कडू (25) या विवाहितेचा मृतदेह शोधण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. विहिरीतील पाणी उपसण्यासाठी ट्रॅक्टरचे पंप मागवण्यात आले. त्याचप्रमाणे गळ टाकण्यात आले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर गळाला तिचा मृतदेह लागला.

दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री पाठवण्यात आले.टाकळीमिया येथील शिंदे व देवळाली प्रवरा येथील कडू कुटुंबामध्ये काही वर्षापूर्वी विद्या व दिलीप कडू यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला होता. दोघांचा संसाराचा गाडा सुरळीतपणे पुढे जात असताना त्यांना सिद्धीच्या रूपाने लक्ष्मी रत्न मिळाले. दरम्यान, काही दिवसानंतर विद्याताई कडू यांना स्वास्थ्य समस्यांनी ग्रासले. त्यांच्यावर मनोरुग्ण म्हणून उपचार सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत होती. दरम्यान, टाकळीमिया येथील शिंदे कुटुंबियाकडे माहेरी असतानाच विद्याताई कडू व त्यांची पाच वर्षाची मुलगी सिद्धी या दोघी गायब झाल्याची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आली होती.

- Advertisement -

कुटुंबियांसह पोलीस प्रशासन शोध घेत होते. दरम्यान, काल दि. 2 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा 5 वर्षीय सिद्धी हीचा मृतदेह अंतवन शांतवर सगळगिळे यांच्या शेतातील विहीरीमध्ये दिसून आला. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमा झाली होती. पाणबुडे बबलू भानुदास नवाळे, संजय माळवे, सुनिल गोसावी व विश्वास गोसावी यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढले. राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रभाकर शिरसाठ, सागर माळी, वाघमारे यांचे पथक घटनास्थळी दाखल होते. टाकळीमिया गावामध्ये शोक पसरला होता.

- Advertisement -