पोलीस बंदोबस्तात वीजबिलांची वसूली

वसुलीसाठी जाणार्‍या वीज कर्मचार्‍यांवर हल्ले होण्याच्या शक्यतेने निर्णय

electricity bills

लॉकडाऊनच्या काळात जादा वीज बिल आल्याच्या कारणावरून सध्या ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे. सोबतच या विरोधात आंदोलन करून भारतीय जनता पक्षाने विषय आणखी तापवला आहे.

अशा परिस्थितीत वीज बिलाच्या वसुलीसाठी जाणार्‍या वीज कर्मचार्‍यांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. असे प्रकार आढळून आल्यास त्यांना पोलीस बंदोबस्त मिळवून दिला जाईल, असे संकेत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. नगर शहरातील तेलीखुंट येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कर्मचार्‍यांना मारहाण झाली. तेथे तनपुरे यांनी भेट देऊन कर्मचार्‍यांना धीर दिला. मात्र, हा प्रकार वसुलीच्या वादातून नव्हे तर दुसर्‍याच कारणातून झाल्याचे सांगण्यात आले.